राजापूरचे नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे यांच्या हस्ते शहरातील नऊ अंगणवाड्यांना पोषण आहाराचे वाटप


एकात्मिक बालविकास प्रकल्‍प अंतर्गत राजापूर शहरातील नऊ अंगणवाडयांना महिला व बाल कल्‍याण निधी अंतर्गत पोषण आहाराचे वाटप लोकनियुक्‍त नगराध्‍यक्ष अॅड.जमीर खलिफे यांचे शुभहस्‍ते करणेत आले. सदरचा पोषण आहार हा प्रत्‍येक मंगळवारी अंगणवाडयांना देण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्व अंगणवाडी सेविकांनी कोरोना काळात बजावलेल्‍या उत्‍तम कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाचे वेळी महिला व बाल कल्‍याण समिती सभापती सौ. प्रियांका आडविलकर, नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी देवानंद ढेकळे, लिपिक विनायक पवार आदी उपस्थित होते.

Comments