हजारांचं बँकेतून कर्ज काढून स्पर्धक आला मुंबईत, नेहा कक्करने केली मदत
Neha Kakkar Helps Indian Idol Contestant: नेहा कक्करने आयुष्यात खूप संघर्ष केला. अथक मेहनतीने वर आल्यामुळेच तिला इतरांच्या वेदना समजतात. इंडियन आयडलमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या शहजादचं स्ट्रगल ऐकल्यावर तिला रहावलं नाही
मुंबई- हनीमूननंतर नेहा कक्कर पुन्हा कामावर रुजू झाली आहे. प्रत्येकालाच माहीत आहे की नेहाने आयुष्यात प्रचंड स्ट्रगल केलं आहे. तिच्या संर्घषाची कहाणी अनेकांना माहीत आहे. जागरनमध्ये गाऊन ती आपल्या कुटुंबाला मदत करायची. आज ती देशातील लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. यशाच्या शिखरावर पोहोचूनही नेहाचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. ती गरजूंना वारंवार मदतही करते. याचीच एक झलक पुन्हा एकदा 'इंडियन आयडल १२' मध्ये दिसली. या शोमध्ये नेहाने एका स्पर्धकाला १ लाख रुपयांची मदत केली.सोनी वाहिनीने यासंबंधीचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात स्पर्धक शहजाद अली त्याची कहाणी सांगत आहे. त्याचं स्ट्रगल ऐकल्यावर नेहा भावुक होते. शहजाद हा जयपूरचा आहे. शहजादच्या आजीसाठी आणि त्याच्या मेहनतीसाठी नेहा त्याला एक लाख रुपयांची मदत देऊ करते. याचसोबत संगीतकार विशाल दादलानीही शहजादला उत्तम गुरू देण्याचं वचन देतो.नेहाने पैशांची मदत देऊ केली तर विशालने शहजादला प्रशिक्षणासाठी चांगला गुरू देण्याविषयी वचन दिलं. शहजादने नुसरत फतेह अली यांचं 'किन्न सोना तेनू' हे गाणं गायलं. जयपूरमध्ये तो कपड्यांच्या छोट्या दुकानात काम करतो. लहान वयात आईच्या निधनानंतर आजीने त्याला लहानाचं मोठं केलं. मुंबईत येऊन 'इंडियन आयडल'मध्ये भाग घेता यावा म्हणून आजीने ६ हजार रुपयांचं कर्ज घेतल्याचं शहजादने यावेळी सांगितलं.

Comments
Post a Comment