धार्मिक स्थळे खुली करा अन्यथा आंदोलन
केंद्र शासनाने कोविड च्या पर्शवभूमीवर देशात अनलॉक जाहीर करून देशात धार्मिक स्थळं उघडण्यास परवानगी दिल्यावर अनेक राज्यात धार्मिक स्थळं उघडण्यात आली. मात्र महाराष्ट्रात बार, मॉल, दारूची दुकाने उघडण्यास ठाकरे सरकारने परवानगी दिली असताना अद्याप धार्मिक स्थळं उघडण्यास परवानगी दिलेली नाही.
येत्या पंधरा दिवसात मंदिर व मशिद ही धार्मिक स्थळं उघडण्यास परवानगी न दिल्यास आंदोलन सुरू करून मंदिर आणि मशिदी उघडून पूर्ववत पूजापाठ व नमाज पढण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडी रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी दिला आहे.
देशात कोविडच्या पार्श्वभूमीवर ताळेबंदी जाहीर करण्यात आली होती. या दरम्यान सामाजिक अंतर ठेवण्याच्या दृष्टीने धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यानुसार मंदिर आणि मशिदी बंद ठेवत सामूहिक पूजा आणि नमाज पढण्यात आला नाही.
मात्र देशातील कोरोनाची लाट ओसरताच केंद्र सरकारने देशात अनलॉक जाहीर करताच देशातील अनेक राज्यात धार्मिक स्थळे उघडण्यात आली महाराष्ट्रात धार्मिक स्थळे उघडण्याबाबत ठाकरे सरकार उदासीन दिसून येत आहे. असे असताना महाराष्ट्रात मात्र मोदी सरकारने धार्मिक स्थळे उघडण्याचे आदेश दिले असताना ठाकरे सरकार समाजाच्या आस्थेशी खेळ करत आहे. येत्या १५ दिवसात धार्मिक स्थळे खुली न केल्यास तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा जाकीर शेकासन यांनी दिला आहे.

Comments
Post a Comment