गटविकास अधिकारी यांनी कान टोचताच सर्व ,विहीरीवर पडले झांखण !
संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे ग्राम पंचायती हद्दीतील विचारे वाडी सार्वजनिक विहीरी मधे ग्राम पंचायती ने पुर्ण पावसाळा भर टी सी एल पावडर टाकली नाहीच. येवढेच न्हवे तर बाहेरील गटाराचे व सांडपाणी विहीरीत जात अाहे. या विहीरीच्या पाण्याचा वापर काही वेळा पिण्या साठी करण्यात येतो हे सांगुन ही ग्रा प ने साधे लक्ष दिले नाही.
शेवटी ही बाब पत्रकार सत्यवान विचारे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या लक्षात अाणुन दिली असता गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक यांची चांगलीच कान ऊघडणी केली अाणि ऊघड्या विहीरीवर ग्रिन कापड टाकण्यात अाले.
तर एक दिवस टी सी एल पावडर टाकण्यात अाली. वास्तविक सरपंच याच वाडीतील असुन सकाळ संध्याकाळ या विहीरी जवळून जा ये करतात पण या विहीरी कडे पाहाण्यास त्याना वेळ नसल्याचेच दिसुन येते. फ्रेब्रुवारी ते अाॅगस्ट या कालावधीत सरपंच हे अाजारी असल्याने उपचारा साठी जवळ पास पाच महीने मुबंई येथे होते.
या कालावधीत कामे कोणी करायची याचे मार्गदर्शन वेळो वेळी ग्रामसेवक यांना व ज्याने विकास कामाची निविदा घेतली त्याने पोट ठेका कोणाला द्यायचा हे ठरवत होते. ते नसताना धनादेश काढल्याचे व एप्रिल ते मे २०२० मधे लाॅकडाउन असताना विकास कामाचे मजुरांचे हजेरी मस्टर भरल्याचे माहिती अधिकारात स्पष्ठ झाल्याने हे कसे शक्य अाहे.
जर सरपंच गावातच नाहीत तर धनादेश काढले कसे, तसेच लाॅकडाउन असताना मजुराना कामावर कसे बोलावले. सरपंच येथे नसताना हजेरी रजिस्टरवर सरपंच महोदयानी सह्या कशा केल्या असा प्रश्न गटविकास अधिकार्यांना विचारला असता फणसवणे ग्रामसेवक यांनी सरपंच हे मुंबई वरुन येवुन जावुन होते अशी खोटी माहिती मा.गटविकास अधिकारी यांना दिली.
मा. सरपंच हे सुमारे पाच महीने मुबंईला होते हे सर्वाना माहीत असताना ग्रामसेवक यांनी मा.गटविकास अधिकार्याना दिशाभुल करणारी खोटी माहीती पुरवली असुन सरपंच यांनी देखील अापण मुबंईवरुन येवुन जावुन होतो अशी खोटी माहिती ग्राम सेवक यांना दिली असल्याने खुर्ची साठी सरपंच महोदयानी खोटे बोलावे हे निशेधार्थ अाहे .असे खोटे बोलणार्या सरपंच व ग्रामसेवकाचा सत्कार व्हावा अशी मांगणी गावचे ग्रामस्थ सत्यवान विचारे यांनी केली अाहे .
सरपंच यांना पिण्याच्या पाण्या सारख्या महत्वाच्या प्रश्ना कडे लक्ष देण्यास वेळ नाही मात्र कोणते काम कोणी करावे हे मुबंई वरुन सांगणार्या फणसवणे सरपंच यांना पदावर राहण्याचा हक्क अाहे का ? याचा विचार सरपंच यांनी स्वःताच्या मनाला विचारावा व अापण अाणखी कीती खोटे बोलायचे ते ठरवावे. सत्ते साठी अाणखी कीती काळ प्रशासनाची व ग्रामस्थांची दिशाभुल करणार, याच साठी अापणास जनतेने बिन विरोध निवडुन दिले का? असा प्रश्न ग्रामस्थ सत्यवान विचारे यांनी विचारला अाहे .

Comments
Post a Comment