भारतीय संविधान दिनानिमित्त खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रोळीतील प्रतिष्ठीत व्यक्तींना भारतीय संविधानाच्या प्रतीचे मोफत वाटप
मुंबई(शांत्ताराम गुडेकर)
भारतीय संविधान दिनानिमित्त,
ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व भाजपा विक्रोळी विधानसभा अध्यक्ष व माजी नगरसेवक मंगेश पवार यांच्या मुख्य अध्यक्षतेखाली ,
मुंबई उपाध्यक्ष महेश कारीया, ईशान्य मुंबई जिल्ह्याचे महामंत्री अनिरुद्ध गोडसे व महिला जिल्हा मंत्री सुनिता पंदिरकर , नगरसेविका वैशाली पाटील, व प्रभाग क्रमांक-१११ च्या नगरसेविका सौ. सारिका मंगेश पवार यांच्या मुख्य उपस्थितीत विक्रोळी विधानसभा मतदारसंघाच्या सहा प्रभाग क्षेत्रातील मान्यवर प्रतिष्ठित व्यक्तींना संविधान पुस्तिकेचे मोफत वाटप करण्यात आले.
विक्रोळी पूर्वेकडील रामनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भारतीय संविधान दिनानिमित्त वार्ड क्रमांक ११९ चे वार्ड अध्यक्ष देवेंद्र डोके, ईशान्य मुंबई जिल्हा मंत्री सुरेश यादव, यांनी या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध पद्धतीने उत्कृष्ट आयोजन केले होते.यावेळी,विक्रोळी विधानसभा मतदार संघातील प्रतिष्ठीत व्यक्तींना भारतीय संविधानाची पुस्तिका मोफत वाटप करण्याची ही संकल्पना विधानसभा अध्यक्ष मंगेश पवार यांची होती. या कार्यक्रमासाठी वार्ड अध्यक्ष देवेंद्र डोके,व सुरेश यादव यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली व कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली.याप्रसंगी , भाजपा ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री अनिरुद्ध गोडसे मार्गदर्शन करताना म्हणाले की,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या राज्यघटनेच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.याचा सर्वांना अभिमान वाटतो. संविधानाने भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, या मूल्यांची शिकवण दिली. संविधानाने देशातील नागरिकांमध्ये भारतीयत्वाची जाणीव निर्माण केली आहे.
समाजात संविधानाची जाणीव व जागृती व्हावी. संविधानाचे हक्क अधिकार याची माहिती मिळावी.अशा या शुभदिनी नगरसेविका सारीका पवार यांनी प्रत्येक वार्डातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना सन्मानित करून संविधानाच्या प्रति मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मनापासून कौतुक करतो ,असे गौरवोद्गार ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री अनिरुद्ध गोडसे यांनी विक्रोळी पूर्वेकडील रामनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काढले.विक्रोळी विधानसभा अध्यक्ष व माजी नगरसेवक मंगेश पवार मार्गदर्शन करताना म्हणाले,२६ जानेवारी १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आणली गेल्यानंतर २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताची राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा हा पायाभूत कायदा आहे. २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला गेला. असेही मंगेश पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर सांगितले.
आजच्या संविधानाचे महत्व सर्वांना समजणे हि काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया नगरसेविका सारीका मंगेश पवार यांनी यावेळी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. व त्यानंतर २६/११ च्या आतंकवादी हल्ल्यात निरपराध पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचे निष्पाप बळी गेले अशा शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले.यावेळी, विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील वार्ड अध्यक्ष, आशिष हडकर, वीरेंद्र महाडिक, प्रथमेश राणे, रमेश सिंह, विलास सोहनी, तसेच रजनी कदम ,तारा कृष्णन व अन्य महिला पुरुष वार्ड पदाधिकारी व प्रभाग क्रमांक ११९ मधील स्थानिक भाजपा कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments
Post a Comment