चिपळूण तालुक्यामध्ये वाढत असलेल्या गांजा अमली पदार्थावर निर्बंध लावावे निवेदन सादर!! चिपळूण....

 चिपळूण तालुक्यामध्ये दिवसेंदिवस गांजा या अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे आणि ती सेवन होत आहे अशी चर्चा सर्वच स्तरातून ऐकण्यास मिळत आहे. गांजा सेवन करणे यामध्ये युवकांचे ही प्रमाण वाढल्याने युवा पिढी व्यसनांकडे वळण्याचे कल दिसत आहेत.तसेच महाविद्यालयीन मुलांचाही कल याच दिशेने दिसत असून ते भविष्यात घातक ठरू शकते गांजा सेवनाचे प्रमाण वाढल्याने अनेक कुटुंब ही बेघर झाल्याचे दिसत आहे. चिपळूण तालुक्यातील गांजा विक्री व गांजा सेवन या गोष्टींचा नायनाट व्हावा असे अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष शौक़त मुकादम राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष दादा साळवी, तसेच समीर पाटेकर विकास गमरे, ऋतुजा डाकवे, खलिद पटाईत, रवींद्र इंगवले, सनी आरेकर,सचिन सडवीकर यांनी चिपळूण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना निवेदन दिले.


Comments