सुजल पवार आणि तन्मय पवार या भावांचे शिष्यवृत्ती परिक्षेत सुयश
देवरूख : प्रतिनिधी
देवरूख शहरातील पाध्ये इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी सुजल सुनील पवार आणि तन्मय सुनील पवार यांनी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत सुयश संपादन करत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
सुजल आणि तन्मय हे दोघेपण भाऊ असून ते आंगवली येथील जनता विद्यालयाचे दिवंगत शिक्षक सुनील पवार यांचे सुपुत्र आहेत. तर त्यांची आई साक्षी सुनील पवार यादेखील शिक्षीका आहेत. सुजल आणि तन्मय हे दोघे भाऊ हुशार असून सुजलने 236 गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत 20 वा क्रमांक तर तन्मयने 232 गुण प्राप्त करत 27 वा क्रमांक पटकावला आहे. संगमेश्वर तालुक्यात सुजलने पाचवा व तन्मयने सातवा क्रमांक प्राप्त करून यश मिळवले आहे. आपल्या वडीलांप्रमाणेच या दोघांनी हुशारीची चमक दाखवत आपल्या कुटुंबाचे, गावाचे आणि शाळेचे नाव उंचावले आहे. सुजल आणि तन्मयला नृत्य व चित्रकलेची आवड आहे. यात त्यांनी अनेक बक्षिसेही मिळवली आहेत. तर यापुर्वी विविध परिक्षांमध्येही सुयश प्राप्त केले आहे. त्यांना शिष्यवृत्ती परिक्षेसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि पालक यांच्या मार्गदर्शनामुळे व त्यांच्या कठोर मेहनतीमुळेच त्यांनी हे यश मिळवले आहे. त्यांनी मिळवलेल्या सुयशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तर तालुकावासियांकडूनही त्यांचे कौतुक होत आहे.
फोटो- 1) सुजल पवार
2) तन्मय पवार


Comments
Post a Comment