पोलिसांचे नागरिकांना सुरक्षिततेचे आवाहन


दिवाळीच्या सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी बंद घरांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना शहर पोलिस निरीक्षकांनी केल्या आहेत. दिवाळी सणानिमित्त अनेक लोक घरे किंवा फ्लॅट बंद करून आपल्या गावी किंवा पाहुण्यांकडे जात असतात. याच दरम्यान चोऱ्यांचे प्रकार वाढतात. 

चोरटे या सणासुदीच्या दिवसाचा फायदा घेतात आणि चोरी करतात. त्यामुळे नागरिकांनी दागदागिने, रोख रक्कम बंद घरात न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावी. तसेच शेजाऱ्यांना सांगून जावे अथवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना व वॉचमनला माहिती द्यावी, अशा सूचना शहर पोलिस ठाण्यातर्फे करण्यात आल्या आहेत.

Comments