सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे उद्या दापोली दौऱ्यावर
रत्नागिरी:राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शुक्रवार 20 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 9.15 वाजता महालक्ष्मी रेसकोर्स मुंबई येथून खाजगी हेलिकॉप्टरने दापोली जि. रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 9.55 वाजता दापोली जि.रत्नागिरी येथे आगमन व सकाळी 10.30 वाजता उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे भेट व राखीव.

Comments
Post a Comment