गडगडी प्रकल्पाचा डावा कालवा अशोकराव जाधवांच्या प्रयत्नाने पुर्ण होणार ! सहा गावांचा पाणी प्रश्न सुटणार - अशोकराज पवार

 संगमेश्वर - गडगडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे बोरसुद येथील काम पूर्ण करून सहा गावांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्या साठी मा अशोकराव जाधव रत्नागिरी जिल्हा काँग्रेस ऊपाध्यक्ष आणि प्रवक्ता यांनी पाठपुरावा केल्याने सुटणार असल्याने सहा ही गावात जनतेत समाधान व्यक्त होत असलेचे विधान सामाजीक कार्यकर्त आणि शेतकऱ्यांचे नेते अशोकराज पवार काटवली यांनी केले .

या बाबत काटवली , विघ्रवली , सायले , कोसुंब , कोंड ओझरे , कुळ्ये , बोरसुद गावातील ग्रामस्थांनी अशोकराज पवार यांचे नेतृत्वा खाली काँग्रेसचे अशोकराव जाधव यांची भेट घेवून पाणी प्रश्न सोडविण्याची विनंती केली होती त्यावर तात्काळ अशोकराव जाधव यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील , त्यांचे स्विय साहय्यक जाधव , चिफ इंजिनियर  नारकर मॅडम यांचेशी चर्चा करून  कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेवून प्रश्नावर तोडगा काढला त्या बद्यल आमची पंचक्रोशी अशोकराव जाधव आभारी आहे असे पवार यांनी सांगितले .

( प्रसिद्धी साठी )




Comments