संकटमोचक पांड्या! तुफानी फलंदाजी करत रचला इतिहास केदार जाधवचा विक्रम मोडला
भारताचा धडाकेबाज फलंदाज हार्दिक पांड्या संकटात सापडेल्या भरातीय संघासाठी तुफानी फलंदाजी करत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३७५ धावांचा पाठलाग करणाऱ्या भरतीय संघाची सुरुवात खराब झाली. मयंक अग्रवाल, कर्णधार विराट कोहली, श्रेअस अय्यर आणि राहुल झटपट बाद झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला होता. भारतीय संघासमोर मोठ्या पराभवाच संकट हार्दिक पांड्यानं तुफानी फलंदाजी करत मिटवलं आहे.
हार्दिक पांड्यानं पाचव्या क्रमांकावर तुफानी फलंदाजी करत आपल्या नावावर एक विक्रम केला आहे. पांड्यानं भारताकडून सर्वाधिक वेगवान एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे. हार्दिक पांड्यानं केदार जाधवचा विक्रम मोडला आहे. हार्दिक पांड्यानं ८५७ चेंडूमध्ये १०० धावांचा टप्पा पार केला आहे. केदार जाधवनं ९३७ चेंडूत एक हजार केल्या होत्या. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान एक हजार धावा करण्याचा विक्रम विडिंजच्या आंद्रे रसेलच्या नावावर आहे. रसेलनं ७६७ धावांत एक हजार धावा चोपल्या आहेत. ल्यूक राँची दुसऱ्या, आफ्रिदी तिसऱ्या आणि अँडरसन चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर आहे.


Comments
Post a Comment