रत्नागिरी एसटी आगारात कंडक्टरची आत्महत्या
रत्नागिरी एसटी महामंडळाच्या बस आगारात एका बसवाहकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पांडुरंग संभाजीराव गडदे असं या बस वाहकाचे नाव आहे.पांडुरंग गडदे हे रत्नागिरी एसटी बस आगारात सेवेत होते.
8 नोव्हेंबर रोजी नांदेड ते रत्नागिरी अशी नियोजित कामगिरी करून आले होते. आगारात आल्यानंतर व्यवस्थापकांकडे त्यांनी संपूर्ण हिशेब दिला. त्यानंतर ते आगारातील चालकांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. दुपारी 4 वाजेच्या सुमारास त्यांचे रूमचे पार्टनर पी.ए.तांदळे हे गडवे यांना उठवण्यासाठी गेले होते. रूमचा दरवाजा वाजवल्यानंतरही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
त्यामुळे त्यांना संशय बळावला. त्यामुळे तांदळे यांनी दार तोडून आत प्रवेश केला असता पांडुरंग गडदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर तातडीने तांदळे यांनी या घटनेची माहिती आगार नियंत्रक रमेश केळकर यांना माहिती दिली. पांडुरंग गडदे यांच्या आत्महत्येमुळे आगारात एकच खळबळ उडाली.

Comments
Post a Comment