नवा कालभैरव मंदिरात रविवारी रांगोळी प्रदर्शन

 चिपळूण: श्री देव नवा काळभैरव देवस्थानतर्फे सालाबादप्रमाणे रंगावली प्रदर्शन रविवार दि. २९ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आहे. ज्यांना या प्रदर्शनात रांगोळी काढायची असेल त्यांनी आपली नावे श्री. संतोष केतकर (९८५०८८८२७४) यांचेकडे द्यावीत. दि. २९ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत रांगोळ्या काढायच्या आहेत. सायंकाळी लोकांना प्रदर्शन पाहता येईल. प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या १२जणांना सहभागी होता येईल. रांगोळी ३x३ फूटपेक्षा मोठी नसावी. रंग आणि रांगोळी ज्याचे त्याने आणायचे आहेत, असे नवा कालभैरव देवस्थान, चिपळूणच्या वतीने कळविण्यात आले आहे.


Comments