शाळा प्रभानवल्ली नं.७ चा पार्थ गुरव शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत
राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांच्यातील गुणवत्तेला वाव मिळावा, स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी यादृष्टीने महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत जि.प.प्राथमिक शाळा प्रभानवल्ली नं. ७ ता.लांजा शाळेने घवघवीत यश संपादन केले.
या शाळेचे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वच्या सर्व विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते आणि सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे शाळेचा निकाल १००% लागला. विशेष बाब म्हणजे शाळेचा एक विद्यार्थी कु. पार्थ पांडुरंग गुरव हा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत जिल्ह्यात ८१ व लांजा तालुक्यात ४ था आला.
सर्वसामान्य परिस्थिती असूनही पार्थ ने आपल्या बुद्धिमत्तेच्या व मेहनतीच्या जोरावर हे यश खेचून आणून आपल्या शाळेचे, गावाचे तसेच आपल्या पालकांचे नाव उज्वल केले आहे. यामुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्याचे व त्याच्या पालकांचे कौतुक करण्यात येत आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेताना शाळेमार्फत नियमित शाळेच्या वेळा व्यतिरिक्त जादा तास घेण्यात आले. सराव करून घेताना जवळपास १०० पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करण्यात आला. यावेळी त्याला शाळेतील शिक्षक श्री. उमेश नागनाथ कोटलवार व मुख्याध्यापिका यांचे मार्गदर्शन लाभले.
पार्थ गुरव याच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी मा.संदेश कडव साहेब, लांजा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मा.सोपनूर साहेब, विस्तार अधिकारी मा. अशोक सोळंके साहेब, मा.बंडगर साहेब, केंद्रप्रमुख मा.अधिकराव पाटील सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.देवेंद्र गुरव व सर्व सदस्य, सर्व प्रभानवल्ली ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक व पालक यांच्यावतीने कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

धन्यवाद दैनिक फ्रेश न्यूज
ReplyDelete