सह्यांची मोहीम घेऊन काहीही साध्य होणार नाही; फडणवीस सरकारच्या काळात नळपाणी योजनेला स्थगिती का आणली?

 रत्नागिरी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांचा विरोधकांवर हल्लाबोल


अँकर:-

रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेवरुन विरोधक सह्यांची मोहीम राबवत आहेत. परंतू त्याचा आमच्यावर काहिच परिणाम होणार नाही. रत्नागिरिकरांच्या पाण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नक्किच कठोर भूमिका घेऊ. राजकारणासाठी राजकारण करणार नाही. अशा शब्दात रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रदिप उर्फ बंड्या साळवी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. 

आलिमवाडी येथील जमीन खरेदीचा निर्णय त्रिस्तरीत समितीने घेतला. नगर परिषदेने जमिनिची किंमत ठरवण्याबाबत टाऊन प्लानिंग विभागाकडे प्रस्ताव सादर केला. त्या विभागाने आलिमवाडी जमिमिचे मुल्यांकन करुन जमिनिची किंमत ठरवण्यात आली. मात्र हाच मुद्दा सध्या विरोधकांना मिळाला आहे. शहरातील नागरीकांना मार्च 2021 अखेर पर्यंत सुरळीत नविन नळपाणी योजनेतून पाणीपुरवठा करण्याचीच भूमिका आहे. आणि ही नळ पाणी योजना आम्ही पूर्णत्वास नेऊन दाखवणारच असा दावा नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी केला आहे.

Comments