राजापूर दिवटे वाडी रिसरात फिरणार्‍या बिबट्याला पकडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात


राजापूर शहरातील दिवटे वाडी परिसरात बिबट्या वाघाचा संचार होत असून यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झालेले आहे. या परिसरात असलेल्या पाळीव प्राण्यांवर हा बिबट्या वाघ हल्ला करत आहे.

त्यामुळे वनविभागाने या बिबट्या वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांनी केली आहे.

Comments