गणपतीपुळेत आठवडाभरात सुमारे 40 हजार पर्यटकांची हजेरी

 रत्नागिरी:कोरोनाचा धोका कायम असतानाही दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी पर्यटक बिनधास्तपणे कोकणातील किनार्‍यांवर उतरलेले आहेत. त्यामुळे किनारे फुलेले असून पर्यटन व्यावसायाला चालना मिळाली आहे. गेल्या आठवडाभरात गणपतीपुळेमध्ये सुमारे 40 हजार पर्यटकांनी भेट दिल्याचा अंदाज आहे. मात्र, कोरोनाचे नियम, निकषाकडे दर्शन रांगांसह किनार्‍यांवरील पर्यटकांकडून कानाडोळा केला जात असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.


Comments