मोफत धान्य वितरण योजना 30 नोव्हेंबरला बंद होणार की सुरूच राहणार?; जाणून घ्या सर्वकाही धान्य मोफत देण्याची सरकारची योजना आता 30 नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे.

 नवी दिल्ली: पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत (PMGKAY) मोफत धान्य देण्याची योजना आता लवकरच बंद होणार आहे. देशात लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळापासून मोदी सरकारने जवळपास 81 कोटी शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप केले आहे. ही योजना विशेषत: प्रवासी कामगार आणि गरीब लोकांसाठी सुरू केली गेली होती. अन्न, ग्राहक आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेची तारीख यापुढे वाढविण्यात येणार नाही. धान्य मोफत देण्याची सरकारची योजना आता 30 नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. (Free Grain Distribution Scheme Actually End On November 30 Modi Government Ration Card )


मोफत रेशन देण्याची योजना 30 नोव्हेंबरला संपुष्टात

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा पाच किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ विनाशुल्क वाटप करण्यात आले आहे. आता ही योजना 30 नोव्हेंबर रोजी संपेल. ही पुढे चालू ठेवण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

मंत्रालयाचा एक अधिकारी म्हणतो, “यापुढे ही योजना पुढे चालू ठेवली जाणार नाही.” होय, ज्या लोकांनी कोणत्याही कारणास्तव रेशन घेतले नाही, त्यांना त्यांच्या वाट्याचं धान्य विनामूल्य दिलं जाऊ शकते. त्याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम (NFSA) अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणालीचे (PDS) रेशन लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणे परवडणा-या दराने देण्यात आले. पीएमजीकेवाय अंतर्गत मोफत रेशन वितरण करण्याची योजना आता 30 नोव्हेंबरनंतर बंद केली जाणार आहे. free grain distribution scheme actually end on november 30 modi government ration card

यंदा मार्च महिन्यात कोरोना साथीचं मोठं संकट आलं. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा केली. याअंतर्गत ज्या गरीब कुटुंबांकडे रेशनकार्ड आहे, त्यांना एप्रिलपासून दरमहा 5 किलो गहू / तांदूळ आणि दरमहा एक किलो चणे मोफत देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे हे मोफत धान्य रेशन कार्डावरच्या धान्याच्या सध्याच्या कोट्याव्यतिरिक्त आहे.


Comments