दापोलीच्या समुद्रात 3 तरुण बुडाले
दापोली :दापोलीच्या समुद्रात तिघेजण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. एकाचा मृत्यू झाला असून दुसरा बेपत्ता आहे. तर तिसऱ्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील पाळंदे बीचवर महाड येथून आठ तरुणांचा समूह पर्यटनासाठी आला होता. त्यापैकी तीन तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. दिवाळीच्या दिवशी ही घटना घडल्याने दापोलीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Post a Comment