उक्षी मोहल्ला ते रेल्वेस्टेशन रस्त्याच्या निधीसाठी 23 नोव्हेंबरला आमरण उपोषण :- रमजान गोलंदाज

 


रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागात असणारे आणि विकासापासून वंचित असणारे उक्षी गावाला विकासाचे ग्रहन लागले आहे. उक्षी हे रत्नागिरी तालुक्याचे शेवटचे टोक असून गेली अनेक वर्षे या गावाचा विकास चोरीला गेला असल्याचे मत नवनिर्मिती फाऊंडेशन उक्षीचे संस्थापक अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी मांडले आहे.

गावाला 50 वर्षेपुर्वी उक्षी नावाचे रेल्वेस्टेशन मिळाले मात्र ग्रामस्थचे दुर्दैव म्हणावे लागेल या रेल्वेस्टेशनला जाण्यासाठी रस्त्याच नाही. नवनिर्मिती फाऊंडेशनचे रमजान गोलंदाज यासाठी वेळो वेळी मागणी करत असून पत्र व्यवहार करत आहे मात्र गेली 7 ते 8 वर्षे या रस्त्यासाठी आश्वासनाची खैरात केली जातेय. 

त्यामुळे आता खैरात नको काम सुरु झाले पाहिजे. 23  नोव्हेंबरच्या आत काम सुरु झाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन पालकमंत्री अनिल परब यांना देण्यात आले आहे.

15 ऑगस्ट 2019 ला उपोषणला बसणार म्हणून यंत्रणा जागी झाली आणि त्या रस्त्याचे इस्टिमेंट तयार झाले आणि कागद पत्र हल्ली. उपोषण होऊ नये म्हणून काही महिन्यातच काम निधी उपलब्ध करून  सुरु करू असे सांगण्यात आले मात्र निधीचा पत्ता नाही. त्यामुळे आता मागार घेणार नसून जो पर्यत काम सुरु होत नाही तो पर्यत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार रमजान गोलंदाज यांनी केला आहे.

गेली अनेक वर्षे रेल्वेस्टेशन असून त्या करीता जाण्यासाठी रस्त्या नाही मग हे रेल्वेस्टेशन काय कामाचे?असा सवाल सहाजिक कोणालाही पडण्या सारखा आहे. हे रेल्वेस्टेशन वांद्री,बावनदी,संप्तलिंगी, मानसकोंड, परचुरी, आंबेड, सोनगिरी,कुरधुंडा,गावमळा, करबुडे, रानपाट,लाजुळ,डिंगणी,फुणगुस,मेढे,मांजरे आदी गावाना याचा फायदा असून या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्याच नसल्याने मोठी पंचायत झाली आहे. 

लोकांना मुंबईतुन गावी येण्यासाठी 100 रुपये मोजावे लागतात. मात्र येथे रस्त्या नसल्याने संगमेश्वर किंवा रत्नागिरी रेल्वेस्टेशन वर उतरून यावे लागते. त्यासाठी चक्क 700-800 रुपये चाकरमान्यांना मोजावे लागतात.उक्षी मोहल्ला ते रेल्वेस्टेशन या रस्त्यासाठी गेली अनेक वर्षे लोकप्रतिनिधी जिल्हानियोजन अधिकारी,रेल्वे प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करूनही डोळेझाक केले जात आहे. 

या रेल्वेस्टेशन मुळे मार्ग तर मिळाले पण सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय करण्यास संधी मिळेल. मात्र डिम्म असणारे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामध्ये वरील सर्व बाबींचा उल्लेख केला आहे. या स्वतंत्र असणारे देशात गावाच्या विकासास उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागतो या पेक्षा मोठे दुर्दैव कोणते? असा सवाल ही ग्रामस्थ विचारत आहेत.

आवश्यक असणारे कामे मागुन मिळत नाही मग किती दिवस खड्ड्यातून चालायचे. उक्षी गावचे माजी सरपंच अन्वर गोलंदाज याच्या काळात हा  मातीचा  रस्ता खोदुन रेल्वेस्टेशन पर्यंत जोडण्यात आला मात्र त्या काळापासून या रस्त्याच्याठी पाठपुरावा केला जातोय. आता तर हा रस्त्या चालण्याच्या लायक राहीला नाही. 

हा रस्त्या झाल्यावर गावाच्या विकासाला चालणा मिळेल असेही ग्रामस्थांचे मत आहे. पण 15 वर्षा पेक्षा जास्त या रस्त्यासाठी मागणी करूनही याकडे लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन याना लक्ष देण्यास वेळ नसल्याचे बोलले जाते. यावेळी उक्षी मोहल्ला ते रेल्वेस्टेशन जाणारे रस्त्याला जो पर्यंत निधी उपलब्ध करून देत नाही तो पर्यंत माघार घेणार नसल्याची माहीती रमजान गोलंदाज यांनी दिली आहे.

 आता गावाच्या विकासासाठी जीव गेला तरी बेहतर

गावाच्या विकासासाठी किती पदर पसरवावा यालाही मर्यादा असते. या मागे कोणते राजकारण करायचे नसून आम्हाला कामाची अपेक्षा आहे. मात्र दर वेळी कागदी घोडे नाचवले जातंय. त्यामुळे आता आधी रस्ता मग  बाकीची कामे त्यामुळे गावांच्या विकासासाठी जीव गेला तरी बेहत्तर पण माघार घेणार नाही. यावेळी माझे काय बरे वाईट झाल्यास प्रशासन जबाबदारी राहील असे ही रमजान गोलंदाज म्हणाले.

Comments