बोऱ्या व नरवण येथे दारू धंद्यांवर धाड टाकत13हजारांचा मुद्देमाल जप्त
गुहागर:बोऱ्या व नरवण भंडारवाडा या दोन ठिकाणी गुहागर पोलिसांनी सोमवारी टाकलेल्या धाडीत विनापरवाना देशी-विदेशी दारूच्या बाटल्या तसेच गावठी हातभट्टीची दारू असा एकूण 13हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी सुप्रिया संदेश ठाकूर व नितेश दिनेश आरेकर यांच्यावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment