गावठी दारू दुकानांवर धाड 12 हजारांचा मुद्देमाल जप्त
पाचाड येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बेकायदा होणाऱ्या गावठी दारूच्या दुकानावर धाड टाकली. वहाळफाटा येथील हातभट्टीवर सावर्डे पोलिसांनी धाड टाकली. दोन ठिकाणी टाकलेल्या कारवाईत ११ हजार ९७० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. १०) दुपारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
वहाळफाटा येथील कापशी नदी किनारी सावर्डे पोलिसांना हातभट्टी लावलेली आढळून आली. पोलिसांनी ती उद्ध्वस्त करून अशोक अनंत भंडारी (वय ५०, वहाळफाटा कोष्टीवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तसेच दुपारी तीन वाजता पाचाड येथे धाड टाकली. रूपेश शंकर खताते (वय. ३७, रा. तळीबुरूडवाडी, पाचाड) हा बेकायदा गावठी दारू विक्री करताना आढळून आला.

Comments
Post a Comment