मिरजोळे विमानतळ येथे 1 किलोच्या गांजासह 64 हजारांचा मुद्देमाल जप्त


रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे विमानतळ येथील स्टॉप जवळ शहर पोलीसांच्या डिबी स्क्वॉडने सापळा रचून गांजाविक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली. त्याच्याकडून 12 हजार रुपयांचा 1 किलो गांजा आणि रिक्षा असा एकूण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

शिवलिंगप्पा मल्लेशी पुजारी (26, रा. क्रांतीनगर, रत्नागिरी ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गुरुवारी डिबी स्क्वॉडला विमानतळ येथील स्टॉप जवळ पुजारी गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक अनिल लाड, पोलीस निरीक्षक मनोज भोसले, सहाय्यक पोलीस फौजदार साळवी, हरचकार, पोलीस हवालदार दीपक जाधव, उदय चांदणे, कोकरे, पोलीस नाईक प्रवीण बर्गे, राहुल घोरपडे, गणेश सावंत, विलास जाधव, अलीम यांनी केली.

Comments