बँकेचा मॅनेजर बोलतोय सांगून खेडशीतील महिलेची 1 लाख 50 हजार रुपयेची फसवणूक

 रत्नागिरी: मी बँकेचा मॅनेजर बोलतोय, तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे. त्याची केवायसी करायची आहे. त्यासाठी आपला अकाऊंट नंबर व आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल तो सांगा. अशी बतावणी करत अज्ञाताने खेडशी येथील महिलेकडून बँक खात्याची माहिती घेत खात्यातील 1 लाख 50 हजार 18 रुपये काढून घेतल्याची घटना बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी घडली. फसवणूक झाल्या प्रकरणी विनोदिनी विनोद कडवईकर (49, रा. एकता नगर खेडशी) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments