RTO कार्यालयातील एजंट कडून लोकांची पिळवणूक पुन्हा सुरु



रत्नागिरी जिल्ह्यातील आर.टी.ओ. कार्यालयातील अनधिकृत एजटची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून या एजट मुळे वाहनचालकांची लूट होत असल्याचे बोलले जातं आहे. रत्नागिरी जिल्हयातील वाहन धारक हे लावून या कार्यालयात आपल्याला वाहणाचे लायसन्स किंवा गाडी पासून अश्या कामासाठी येत असतात मात्र या ठिकानी कार्यालयात वाहन चालकाना माहिती देण्यासाठी कोणच कोणताच कक्ष उपलब्ध नाहीत.

येथील कर्मचारी उद्धट भाषेत लोकांशी बोलतात.एखाद्या वाहन चाकाने स्वतः कागद पत्र तयार केली तर जे काम 2/3 दिवसात झाले पाहिजे त्याला महिना लागतो मात्र एजन्ट पकडून काम केलात तर ते काम 1/2 दिवसात होत.नेमके चाललंय काय?  असा सवाल आता वाहन चालक आणि काही संघटना विचारू लागल्या आहेत. 

काही सुशिक्षित लोक या ठिकाणी स्वतःहुन काम करण्याचा पर्यत करतात पण एजन्ट नसल्याने त्यांचे काम थांबवलेजाते.या एजन्ट मुळे सर्व कामाचे दर आवाच्या सव्वा करू ठेवले असून ऑनलाइनच्या नावाने गंडा घातला जातोय. अधिकारी वर्गाला एजन्टच हवा त्याशिवाय काम होत नाहीत. एजन्ट आणि अधिकारी यांच्यात मोठे साठेलोटे असल्यामुळे हे धंदे आर.टी.ओ. कार्यालयात सुरु असल्याचे बोलले जातं आहेत.500 च्या कामाला तीन हजार पासून पाच हजार रुपये लुबाडले जातं असून कार्यालयाच्या परिसरात या एजन्ट लोकांनी आता धंदाच सुरु केलाय.

काही दिवसापूर्वी एका तरुनाणे स्वतः लायसन्स रीनीव्हलसाठी अर्ज केला मात्र त्याला 2/4 वेळा फेऱ्या माराव्या लागल्या एवढं नाहीत तर एका अधिकारीने एजन्ट केला नाहीत म्हणून कागदपत्र फेकून दिले आणि एजन्टचा शिक्का मारल्यावर काम ओके झाले? असे अनेक प्रताप या कार्यालयात सुरु आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री या परिवहन खात्याचे मंत्री आहेत पण ते जिल्ह्यातच येत नसल्याने कार्यालयात लोकांचे काय हाल होत आहेत हे काय बघनार?आर. टी.ओ. कार्यालयातील कामकाजची पद्धत सुद्धारली नाहीत तर लवकरच मोठे आंदोलन जिल्ह्यात होण्याची संकेत आहेत.त्यामुळे वरिष्ठ अधिकारीनी आपला कर्मचारी व अधिकारीना योग्य पद्धतीने सहकार्य करण्याचे सूचना देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. 

जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्रचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आर.टी.ओ. कार्यालयात होत आसलेल्या साठेलोठेची चोकशी करून कार्यालयातील परिसरात आणि कार्यालयात असलेल्या एजन्टची दुकानें बंद करून कार्यालयातील कर्मचारी लोकांच्या सेवेसाठी नेमणूक करण्यासाठी मागणी केली जातेय. ऑनलाइनची फ्रॉम भरण्यापासून सर्व कामे या कार्यालयातील कर्मचारी करून देण्यासाठी किंवा अन्य उपाययोजना करून एजन्ट कडून होत असलेली लूट थांबावन्याची मागणी होत आहे. पालकमंत्री महोदय लोकांच्या समस्या सोडवण्यास वेळ मिळेल का?

Comments