अभिनेत्री कंगना रणौतविरोधात दाखल होणार FIR, वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाचे आदेश


अभिनेत्री कंगना रणौत ची सध्या विविध कारणांसाठी चर्चा होत आहे.दरम्यान अभिनेत्रीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगना रणौत विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने असे म्हटले आहे की, हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे. 

यासंदर्भात आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती.दरम्यान या प्रकरणी आता वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्रीविरोधात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय दिला आहे. कंगनाविरोधात भादवी कलम 153(A), 295(A), 124, 34 IPC अंतर्गत FIR दाखल केली जाणार आहे. याप्रकरणी अभिनेत्रीची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Comments