पोस्ट, आर्मीनंतर इंडियन ऑईलमध्ये भरती; BSc धारकांना 1.05 लाखावर पगार

 


Indian Oil (IOCL) Recruitment 2020: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) मध्ये अनेक पदांवर भरती निघाली आहे. या पदासाठी 25000 ते 1.05 लाख दर महिना पगार देण्यात येणार आहे. 

भरतीशी संबंधित ट्रेडमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा गणित, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये बीएससी झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक योग्यताही वेगवेगळी आहे. याची माहिती खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरील लिंकवर मिळणार आहे. 

कोणत्या पदांवर भरती

ज्यूनियर इंजीनियरिंग असिस्टंट-4 (प्रोडक्शन) - 49 पदे
ज्यूनियर इंजीनियरिंग असिस्टंट-4 (मेक फिटर कम रिगर) / ज्यूनियर टेक्निकल असिस्टंट - 03 पदे
ज्यूनियर इंजीनियरिंग असिस्टंट-4 (इंस्ट्रूमेंटेशन) - 04 पदे
ज्यूनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट - 01 पदे

एकूण जागा  - 57


अर्ज कसा कराल

इंडियन ऑईल ही सरकारी कंपनी आहे. या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर iocl.com जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ही अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2020 पासून सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार 07 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज करू शकतात. 

निवड प्रक्रिया
या पदांवर योग्य उमेदवाराची निवड लिखित परिक्षेद्वारे केली जाणार आहे. ही परिक्षा 29 नोव्हेंबरला घेतली जाईल. 

Comments