एका चुकीमुळे केरळ, कर्नाटकात पुन्हा वाढत आहेत कोरोना रुग्ण; महाराष्ट्राचाही धोका कायम

 


आता दसरा तोंडावर आला आहे. याशिवाय पुढील काही दिवसांत अनेक सण येत आहेत. त्या महाराष्ट्रामध्ये मंदिरं उघडण्याची मागणी जोर धरते आहे. अशात आता देशातील कोरोनाबाबत धक्कादायक आकडेवारी समोर येते आहे.देशातील कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 79% रुग्ण 10 राज्यांमध्ये आहेत. यामध्ये सर्वात जास्त  25.38% महाराष्ट्रात आहेत. तर केरळमध्ये हे प्रमाण 11.26% आहे. 

आता केरळपाठोपाठ कर्नाटकातही कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तरी नव्या रुग्णांच्या बाबतीत आता कर्नाटकाने महाराष्ट्राला मागे टाकलं आहे. कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षाही जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 7,089 तर कर्नाटकात 7,606 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.केरळ आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून लक्षणीयरित्या कोरोना रुग्णांची वाढ होते आहे.

ज्या केरळ मॉडेलचं जगभरात कौतुक होत होतं. त्या केरळमध्ये रुग्ण तर वाढतच आहे, शिवाय रुग्ण बरे होण्याचं प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट सर्वात कमी आहे.केरळची एक चूक त्यांना महागात पडली आहे.राज्यात ओनमदरम्यान सूट देण्यात आली आणि त्याचा असा परिणाम पाहायला मिळाला.महाराष्ट्रात तर देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. राज्यातील परिस्थिती पाहता गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा झाला. मात्र तरी गणेशोत्सवानंतर राज्यात प्रकरणांमध्ये वाढ दिसून आली.केरळमधील ओनम आणि महाराष्ट्रातील गणेशोत्सवानंतरची परिस्थिती लक्षात घेता आता यापुढे दसरा आणि दिवाळी हे सण साजरे करताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

Comments