रत्नागिरी महिला रुग्णालयाजवळ एवढ्या विनावापरात असलेल्या आरोग्य विभागाच्या गाड्यांचे काय करणार?
रत्नागिरी शहरानजिक उद्यमनगर येथील महिला रुग्णालयाच्या आवाराच्या परिसरात मागिल काही वर्षांपासून विनावापर आरोग्य विभागाच्या गाड्या पडून आहेत. शासनाच्या निधीतून या गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. मात्र त्या भंगारात टाकल्यासारख्या अडगळीत पडल्या आहेत. या गाड्यांना वाली कोण? असा सवाल उपस्थीत केला जात आहे. सुमारे कोटींच्या घरात जाईल एवढ्या या गाड्या आहेत. जुन्या, मोडकळीस आलेल्या या गाड्या आहेत. मात्र या प्रश्नावर जिल्ह्यातील एकही मंत्री, खासदार, आमदार का बोलत नाहित? असा सवाल उपस्थीत केला जात आहे.
यक़ गाड्या वर्षानुवर्षे तशाच पडून आहेत. ना दुरुस्ती ना लिलाव. या गाड्यांना कुणीही वाली नाही. या गाड्या तशाच ठेवण्याचे नेमके कारण काय आहे याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. लिलाव झाल्यास काही चांगली किंमत शासनाला मिळू शकते. मात्र याबाबत निर्णय कोण घेणार?, खरे तर याबाबत आमदार, मंत्री यांना काही माहीती आहे का?, हा देखील मोठा प्रश्न आहे. सध्या हा परिसर जंगलमय झाला आहे. याची साफसफाई सुद्धा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य स्तरावरुनच याबाबत निर्णय होण्याची गरज आहे.

Comments
Post a Comment