संगमेश्वर - नायरी रस्त्याची दुर्वस्था
शस्त्रीपुल पासून नायरी कडे जाणाऱ्या संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. शस्त्रीपुळ ते कसबा दरम्यान संपूर्ण रस्ता हा महामार्ग अक्षरशः खड्ड्यात गेलेला आहे. शस्त्रिपुल ते नायरी हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना हजार खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यातील काही खड्डे तर एकदम खोल गेलेले आहेत. रस्त्याची संपूर्ण चालणं बनून गेली आहे. या शास्त्रीपुल ते नायरी मार्गावरून प्रवास करणे जोखमीचे बनले आहे. याचा परिणाम रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्ण वाहिकांवर होत आहे. जाखमता मंदिरा जवळ असलेल्या वाकनामध्ये जास्त झाडे झहुडपे झाल्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे.त्यासाठी याकडे संबंधितांनी वेळीच लक्ष द्यावे अशी ग्रामस्थ मागणी करत आहे.



Comments
Post a Comment