अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून नूकसान भरपाई द्यावी

 


मंडणगड तालुक्यात नुकत्याच झालेल्या परतीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून नूकसान भरपाई देण्याबाबत मंडणगड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंडणगड तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.

मंडणगड तालुका हा डोंगराळ भाग असून या भागात फक्त पावसाच्या पाण्यावर पिके घेतली जातात.या मध्ये प्राधान्याने भात,नाचणी.वरी,तीळ वगैरे पिकें घेतली जातात.पिके तयार झाल्यावर व काढणीला आल्यावर मंडणगड तालुक्यात नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले असुन हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे निघुन गेलेला असुन शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना जगणे मुश्किल होणार आहे.

तरी कृपया आपल्या स्तरावर झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ अग्रक्रमांने करण्यात येऊन गरीब शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाकडून मिळाली ही नम्र विनंती.

सदर वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंडणगड तालुकाध्यक्ष श्री.मुझफ्पर मुकादम,माजी तालुकाध्यक्ष श्री.अनिल रटाटे, जिल्हा परिषद सदस्य श्री.प्रमोद जाधव, मंडणगड शहराध्यक्ष श्री.वैभव कोकाटे, मंडणगड तालुका युवक अध्यक्ष श्री.लुकमान चिकलकर, मंडणगड नगरपंचायत गटनेते व नगरसेवक श्री.सुभाष सापते,श्री.वसीम भाई चिपोळकर,श्री.भाई म्हाळुनकर,तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments