शिरवली येथील रेशन दुकानदाराचा परवाना तात्पुरता निलंबित


शिरवली येथील वादग्रस्त रेशनदुकानदार यांचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात येऊन 17 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा परवठा अधिकारी यांनी ही कारवाई केली आहे. शिरवली येथील युवक मंडळाच्या वतीने शिरवली येथील रेशन दुकानदार यांच्याबाबत जुलै आणि सप्टेंबरमध्ये ऑनलाईन तक्रार दिली होती. मृत व्यक्तीचे धान्य परस्पर लाटल्याचा आरोप करण्यात आला होता. 

या प्रकरणात चौकशी करून अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे दिला होता. चौकशीत दोषी आढळल्याने सदर दुकानदार यांचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आला. दंड वसूल करण्यात आल्यानंतर पुन्हा त्याच रेशन दुकानदाराला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, यावर शिरवली युवक मंडळाने आक्षेप घेतला असून पुन्हा या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

Comments