कोरोना मृत्यू प्रमाण घटल्याने अंत्यसंस्कार करणाऱ्या पथकाला दिलासा


कोरोनामुळे होणारे मृत्यू प्रमाण घटल्याने रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या दोन पथकातील अधिकारी, कामगारांना दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णांचे मृत्यू कमी झाल्याने आता हायसे वाटत असल्याचे या दोन्ही पथकांचे प्रमुख अधिकारी जितेंद्र विचारे यांनी सांगितले. सोमवारी सकाळी एकाच रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आतापर्यंत या पथकाने २२७ जणांवर अंत्यसंस्कार केले आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेची दोन पथके बनवण्यात आली. 

रात्री अपरात्री कधीही फोन आल्यानंतर ही पथके रूग्णालयात जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर मृतदेहाची कोणतीही हेळसांड न होता अंत्यसंस्कार करत होते. दिवसाला दोन ते तीन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत होते. मृतदेहाचे नातेवाईक लांबूनच अंत्यदर्शन घेत अंत्यसंस्कार पाहत असत, हे दृष्य मन हेलावणारे होते, असे रनपचे अधिकारी जितेंद्र विचारे यांनी सांगितले. आता मृत्युच्या प्रमाणात घट होताना दिसून येत आहे

Comments