चिपळूण तिवरे धरणाचा प्रथम पूर्ण गाळ काढा मगच धरण बांधकामास सुरवात करा - काँग्रेसच्या अशोकराव जाधवांची मागणी


संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी धरण फुटीची घटना घडून गेली कित्तेक जिव मृत्यू मुखी पडले , घरे दारे वाहून गेली आहाकार ऊडाला पण नंतर प्रशासानाने थातूर मातूर सारवा सारव केली ना कमकुवत धरण बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला अटक केली , ना लाचखोर अभियंता यांना अटक झाली की चौकशी ही झाली नाही आता धरण पुन्हा बांधकामाचे सुमारे नऊ कोटीचे टेंडर निघाले आहे. पण ठेकेदाराने आणि प्रशासनाने सर्व प्रथम जिथे पाणि साठा होतो तिथेच ८० % गाळ भरला आहे आणि तसेच गाळ न काढता धरण बांधले तर नुसताच बांध होयील व 2o % सुध्दा पाणी साठा होणार नाही व सिंचनाचा हेतू ही साध्य होणार नाही. 

या साठी सर्व प्रथम धरण बांधणे पुर्वी सर्व गाळ काढून धरण मोकळे करावे व नंतर पुन्हा पाया पासुन बांधावे नाहितर जमिनितील दुभंग झालेल्या पायावर धरण बांधु दिले जाणार नाही असा इशारा काँग्रेसचे जिल्हा ऊपाध्यक्ष, प्रवक्ता आणि चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक व महाराष्ट्र राज्याचे माजी पुनर्वसन प्राधिकरण सदस्य अशोकराव जाधव यांनी दिला आहे. आज वाहून गेलेल्या तिवरे धरणाच्या होणाऱ्या नव्या बांधकामा विषयी माहीती घेणेसाठी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसच्या चिपळूण तालुक्यातील कार्यकर्ता सहीत गेले होते . 

तेंव्हा त्यांचे सोबत महादेव चव्हाण अल्पेश मोरे , रणजीत डांगे , जमाद्युन सय्यद , याबाबत सर्व माहीती देणारे तानाजी चव्हाण यांनीही गाळ काढण्यावर भर दिला . या बाबत प्रशासनाच्या वतीने अलोरे येथे जे पुनर्वसनाचे काम चालू आहे ते वेगात होण्याचे गरजेचे आहे असे मत अशोकराव जाधव यांनी व्यक्त केले . अशोकराव जाधव महाराष्ट्रात जे मोजके लोक पुनर्वसनातील आणि आपतकालीन व्यवस्थापणात तज्ञ आहेत त्या पैकी एक समजले जातात . अत्यंत कमी पैशात योग्य सुनियोनीत पुनर्वसन आणि आपतकालीन व्यवस्थापन आणि शासनाची आर्थिक बचत ही त्यांची वैशिष्टे आहेत . त्याच्या या ज्ञानाचा ऊपयोग शासनाने प्रकल्पग्रस्थांसाठी व्हावा अशी मागणी प्रकल्प ग्रस्थांकडून होत आहे .

Comments