रामआळी येथील एका ज्वेलर्सच्या दुकानातून पर्स लांबवली



रामआळी  शहरातील रामआळी येथे एका ज्वेलर्सच्या दुकानात खरेदीसाठी गेलेल्या रुक्साना युसुफ खान (वय ४५, अरिहंत सागर बिल्डिंग, महाडवाला-रत्नागिरी) या महिलेची पर्स शनिवारी दुपारी एकच्या सुमारास अज्ञात चोरट्याने लांबविली. त्यामधील दागिने व रोख रक्कमेसह १४ हजार ६४० रुपयांवर चोरट्याने डल्ला मारला. शहर पोलिस ठाण्यात संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments