राजवाडी गावच्या नळपाणी योजनेचे आम. सदानंद चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन संपन्न..

 


तालुक्यातील मौजे राजवाडी येथील नळपाणी योजनेचे उदघाटन आमदार सदानंद चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. राजवाडी नळपाणी योजनेसाठी आमदार सदानंद चव्हाण यांनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत रु. ३५ लक्षचा निधी मंजूर करून घेतला होता. माजी जि.प. उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनीही यासाठी कायम प्रयत्न आणि पाठपुरावा केलेला होता. सदर योजनेअंतर्गत राजवाडी गावासाठी नवीन विहीर, साठवण टाकी, पाईपलाईन यांसह घरोघरी नळ कनेक्शन अशा कामांचा समावेश असून सदरचे काम नुकतेच उत्तमरित्या पूर्ण झाले आहे. घरोघरी नळ कनेक्शनने पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या योजनेचे उदघाटन आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

Comments