अधीक्षक साहेब मुळावर घाव घाला:भट्या उध्वस्त करा


रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दारू आणि मटका, जुगार मोठया प्रमाणात सुरु असल्याच्या बातम्या गेली अनेक दिवस दैनिक फ्रेश न्यूज मध्ये प्रसिद्ध होत आहेत. त्याची दखल घेत रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी आपल्या अधिकारी वर्गाला कारवाई करण्याचे  आदेश दिले मात्र अनेक ठिकाणी कारवाई पण झाले. पण मुळात आता ज्याच्या भट्या आहेत ते उध्वस्त करण्याची मागणी जिल्हा वासिय करत आहेत. 

जिल्हातील अवैध धंद्याचा विषय पोलिस अधीक्षकांनी उचलून धरला असून रोज कारवाईचे सत्र आहे. मात्र हे दिखावा असून महत्वाचे लोकानावर कारवाई का होत नाही?  भाडयाने उभे केलेल्या लोकांवर कारवाई केली जातेय याच्या मुलाशी पोलिस अधीक्षकांणी गेले पाहिजे.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कारवाई होऊन सुद्धा त्याच ठिकाणी दारू धंदे सुरु पुन्हा  झाले आहे.मग कारवाई कशाला?  त्यामुळे कारवाई कशाची करता असा ही सवाल आता विचारला जातोय. पोलिस अधीक्षकानी दारू धंद्यावर कारवाई कराच मात्र रत्नागिरीत ज्या ठिकाणी हातभट्टी आहेत त्या हातभट्टी उध्वस्त करण्याचे आदेश काढले गेले पाहिजेत.दारू भट्यावर कारवाई झाल्यास अनेक प्रतिष्टित लोकांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. त्याने यांच्या पाठीशी असणारे मोहरे समोर आले पाहिजेत अशीच मागणी जोर धरतं आहे. 

रत्नागिरी पोलीस अधीक्षकानी सुरु केलेली अवैध धंद्यावरील कारवाई बात जिल्ह्यातील महिला वर्गाने समाधान व्यक्त केले असून ही मोहिम जोरदार सुरु करण्याची मागणी आता महिला वर्गातून होत आहे. या पूर्वी अनेक ग्रामसभेचे ठराव,अनेक पत्र व्यवहार,मोर्चे या अवैध धंद्या विरोधात देण्यात आले मात्र त्याची हवी तशी दखल घेतली गेली नाही मात्र पोलिस अधीक्षकानी या अर्जंची वाट न पाहत केलेली कारवाई उत्तम आहे. 

दै.फ्रेश न्यूज च्या प्रतिनिधीना धमकीचे फोन

दैनिक फ्रेश न्यूजच्या माध्यमातून अवैध दारू, जुगार, मटका हा विषय लावून धरण्यात आला असून काही धंद्यावाल्याना याचा त्रास होऊ लागला असून त्यांच्या कडून धमकीचे  फोन येऊन लागल्याने या पुढारी लोकांचा दै. फ्रेश न्यूज जाहीर निषेध करतेय. आमची मोहीम सुरूच राहणार असून आमच्या प्रतिनिधीना पोकळ धमक्या दिल्यात तर ही मोहीम या पेक्षा कडक करू. त्यामुळे आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न धंद्या वाल्यानी करू नये. यांसाठी लवकरच पोलिस अधीक्षकाना भेटून सर्व पुरावे, आणि व्हिडीओ त्यांच्याकडे दिले जाणार आल्याची माहिती दै. फ्रेशच्या वतीने देण्यात आली आहे.

Comments