पिसाळलेल्या कुत्र्याचा ११जणांना चावा
शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला आहे. शहरातील काविळतली परिसरात शुक्रवारी सकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल ११जणांचा चावा घेत जखमी केले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पालिका प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांबरोबरच गुरे, गाढवे यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. चिपळूण शहरात ठीक-ठिकाणी होणारी विक्री, उघड्यावर फेकण्यात येणारा कचरा, भाजीपाला, यामुळे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. शिवाय गाढवामुळेही नागरिक हैराण आहेत. शहराच्या विविध भागात झुंडीने आढळणारे कुत्रे काही काळानंतर पिसाळतात आणि नागरिकांना जखमी करतात.

Comments
Post a Comment