रत्नागिरी जिल्हा न्यायालय येथे बालकांवरिल लैंगिक अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांसाठी विशेष पोक्सो न्यायालयाची स्थापना



बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) प्रलंबित आणि नवीन दाखल होणारे खटले यांचे जलद गतीने निर्णित करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय रत्नागिरी येथे विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिकेमध्ये ज्या ठिकाणी शंभरपेक्षा अधिक प्रकरणे प्रलंबित आहे अशा ठिकाणी विशेष न्यायालयाची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाने व इतर जिल्ह्यांबरोबर रत्नागिरीमध्ये देखील विशेष जलदगती पोक्सो न्यायालय स्थापन करण्याबाबत राज्य सरकारला कळवले होते. रत्नागिरी जिल्ह्यासाठी या विशेष न्यायालयाची स्थापना दिनांक 1 ऑक्टोबर 2020 रोजी करण्यात आली असून या न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त महिला सत्र न्यायाधीश श्रीमती वैजयंतीमाला राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून महिला अभियोक्ता श्रीमती मेघना नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.एम.क्यु.एस.एम. शेख यांच्या हस्ते सदर न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 श्री.एल.डी.बिले, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधिश श्रीमती वैजयंतीमाला राऊत, दिवाणी न्यायाधीश श्री. डी.एस.झंवर, सचिव रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री.ए.एम.सामंत, मुख्य न्यायदंडाधिकारी श्री.जी.जी.इटकलकर, सहदिवाणी न्यायाधीश व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री.एस.एन.सरडे, सहदिवाणी न्यायाधीश श्री.ए.ए.वाळूजकर, श्री.एन.सी. पवार, श्रीमती एस.एस.मतकर, श्रीमती आर.एस. गोसवी, श्रीमती पी.एस.गोवेकर, जिल्हा सरकारी वकील श्री.व्ही.बी.गांधी, सरकारी अभियोक्ता श्रीमती मेघना नलावडे व न्यायालयीन कर्मचारी उपस्थीत होते.







Comments