चिपळूण तालुक्यातील पेढे येथे अतिवृष्टीमुळे चार घरांचे नुकसान

 


चिपळूण तालुक्यातील पेढे येथे शनिवारी अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने चार घरांमध्ये माती व पाणी घुसले व मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्याची पाहणी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी केली व लगेच अधिकाऱ्यांना सूचना देवून तातडीने काम करून घेतले. आमदार शेखर निकम यांच्या सहकार्यामुळे तेथील नागरिकांनी समाधान व आभार मानले.

या पाहणी दौऱ्यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, मोहन शिंदे, बबनशेठ पडवेकर,   राष्ट्रवादी युवक सरचिटणीस तुषार गमरे, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, सुधीर भोसले, पेढे सरपंच प्रवीण पाकळे, बाबू माळी, सुधीर गमरे, विद्याधर गमरे, राजनकाका गणफूले, निशा माळी, पोलिस पाटील पाणकर, एम.जी.गमरे, सरपंच संतोष चोपडे, दीपक मोरे, पो.पा. स्नेहा काजरे आदी उपस्थित होते.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या  कामाबद्दल संघर्ष समितीचे अध्यक्ष विश्वास सूर्वे व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून लगेचच अधिका-यांजवळ फोन वरून चर्चा केली व देवस्थान तेथील ग्रामस्थ आदींना विश्वासात घेऊन योग्य तोडगा काढू असे आश्वासन दिले. पेढे चोपडेवाडी येथील पावसामुळे हानी झालेल्या पाखाडीची पाहणी केली व त्याच्या डागडुजीसंदर्भात तातडीची मंजुरी दिली.

Comments