स्वरूपानंद पतसंस्थेच्या दसरा दिवाळी स्वागत ठेव योजनेला ठेवीदारांचा भरभरून प्रतिसाद
स्वरूपानंद पतसंस्थेने घोषित केलेल्या दसरा दिवाळी स्वागत ठेव योजनेला सर्वच १७ हि शाखांमध्ये भरभरून प्रतिसाद प्राप्त होत आहे. पहिल्या ४ दिवसात १ कोटी १९ लाखांच्या ठेवी नव्याने संस्थेत जमा झाल्या.
कोरोनामुळे संथ झालेल्या अर्थकारणाचा फटका स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला बसणार नाही अशी खबरदारी घेत संस्थेने आपले व्यवहार वाढते ठेवले. गेल्या ६ महिन्यात संस्थेकडे १६ कोटींच्या ठेवी जमा झाल्या. संस्थेने मोठ्या प्रमाणावर सुरक्षित कर्जे वितरीत केली. तसेच वसुलीची शिस्त कायम ठेवत ९८.६८ % वसुली ह्या विपरीत स्थितीतही राखण्यात यश संपादित केले आहे. २१६ कोटींच्या ठेवी व १४३ कोटींची कर्जे, १०४ कोटींच्या गुंतवणुका अशी उत्तम आर्थिक स्थिती राखत ठेवीदारांच्या विश्वासाला अधिक दृढता आणली आहे.
दसरा दिवाळी स्वागत ठेव योजनेत अर्थकारणाचा बाज सांभाळत आकर्षक व्याजदर देऊन मंदावलेल्या अर्थकारणात हि ठेवीदारांना आकर्षक आणि तितकीच सुरक्षित ठेव योजना दिल्याने मोठा प्रतिसाद प्राप्त होत आहे असे संस्थेचे अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन म्हणाले.
संस्थेने स्वरुपांजली ठेव योजनेत १२ ते १८ महिन्यांसाठी ७.००% एवढा व्याजदर देऊ केला आहे. तसेच सोहम ठेव योजनेत १९ ते ३५ महिन्यांसाठीच्या मासिक व्याजाच्या योजनेत सर्वसाधारण ६.८०% व ज्येष्ठ नागरिक व महिला यांचेसाठी ७.१०% एवढा व्याजदर देऊ केला आहे.
Comments
Post a Comment