कोंडगाव बाजारपेठेत दै.फ्रेश न्यूजच्या मागणी नंतर अवैध धंद्यावर कारवाई सत्र सुरु



संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव बाजारपेठेत बेकायदा जुगार चालवण्यासाठीचे साहित्य बागळल्याप्रकरणी रूपेश सुरेश सावंत (३१, रा. कोंडगाव बाजारपेठ, संगमेश्वर) विरोधात देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 रत्नागिरीचे नवीन पोलिस अधीक्षक मोहित गर्ग यांनी आल्यावर रत्नागिरीतील दारू धंद्यांवर कारवाईचे आदेश प्रत्येक पोलिस ठाण्यात दिले त्यानंतर काही पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस अधीक्षकांच्या आदेशाचे अपमान होऊ नये म्हणून मोजक्या ठिकाणीच कारवाई करण्यात आली मात्र बडे मात्तबर अजून पोलिसांच्या जाळ्यात का सापडत नाहीत हा मोठा प्रश्न आहे.या अवैध दारू धंद्यावर कारवाई करण्यासाठी दैनिक फ्रेश न्यूज ने हा विषय लावून धरला असून दारू नंतर मटका धंद्यावर ही कारवाईची सुरवात देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन झाली असून इतर ठिकाणी छुपे धंद्यावर कारवाई करण्यास पोलिसांना कधी मूर्त सापडेल असा प्रश्न आता विचारला जावू लागलाय.

रत्नागिरीच्या अनेक भागात दारू, मटका, जुगारचा धंदा  जोरदार पणे सुरु असून पोलीसांचे हप्ते बांधलेले असल्याची चर्चा दबक्या आवाजात असल्याचे बोलले जात आहे, मात्र पोलिस अधीक्षकांनी दिलेले आदेश डावलले जावू नयेत म्हणून प्रत्येक ठिकाणी झालेल्या कारवाईत पोलिसांनी एक- एक मोरक्या उभा करून पोलिस अधीक्षक यांची मनधरणी केली असल्याचे समजते.मात्र गब्बरांवर कारवाई कधी होईल याची वाट पाहावी लागणार आहे.

Comments