मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेल्या बसरा स्टार या इंधनवाहू जहाजाचा प्रवास अखेरचा ठरला
मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेल्या बसरा स्टार या इंधनवाहू जहाजाचा दक्षिण आफ्रिका ते शारजा-दुबई हा समुद्री प्रवास अखेरचा ठरला आहे. आज या जहाजाला किनाऱ्यावर अडकून चार महिने पूर्ण झाले. इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशनच्या सर्वेअरनी केलेल्या सर्व्हेनंतर हे जहाज भंगारात काढण्याचा एजन्सीचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. अतिशय सुरक्षितपणे जहाजाची मोडतोड करून किनारा रिकामा केला जाणार आहे.
बसरा स्टार जहाज इंधन घेऊन दक्षिण आफ्रिकेहून शारजा-दुबईला जात होते. सुमारे २५ हजार लिटर डिझेल या जहाजात होते; मात्र ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा इशारा मिळाला आणि हे जहाज आश्रयासाठी बंदर विभागाची परवानगी घेऊन नर्मदा जेटीला लावण्यात आले होते. जहाजावर तेरा क्रू होते. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न होता. ३ जूनला वादळाचा कोकण किनाऱ्याला जोरदार फटका बसला. या तडाख्यामध्ये जहाजाचा अँकर तुटला आणि जहाज समुद्रात
अजस्र लाटांचा मारा खात ते मिऱ्या किनाऱ्याला लागले. तेव्हा तेरा क्रू जहाजावर होते. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला; मात्र बंदर विभाग, स्थानिक, पोलिस आदींनी रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांची सुटका केली. त्यानंतर जहाजावरील ऑइल आणि डिझेलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. गळती लागल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑइल किंवा डिझेल पाण्यात मिसळून किनारा दूषित होण्याची भीती होती.

Comments
Post a Comment