नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी भाजपा पदाधिका-यांवर केला पलटवार
रत्नागिरी शहरात ६४ कोटीची नळपाणी योजना मंजूर झाली आहे. मात्र काही दुरुस्त्यांच्या कामांसाठी नविन काही निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाचे नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिका-यांकडून या नविन काढलेल्या निविदांवरुन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. खरे तर भाजपाच्या या नवनियुक्त पदाधिका-यांना कुणी ओळखत नाहित.
त्यामुळे हे पदाधिकारी अधिका-यांशी बातचीत केल्याशिवाय नगर परिषद प्रशासनावर आरोप करत आहेत. त्या पदाधिका-यांनी नगर परिषदेत यावे, आणि अधिका-यांकडून सविस्तर माहीती घ्यावी आणि त्यानंतरच या नविन नविन निविदा योग्य आहेत का अयोग्य आहेत हे ठरवावे. असा पलटवार रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी भाजपा पदाधिका-यांवर केला आहे.

Comments
Post a Comment