रत्नागिरी-खंडाळा येथील शिक्षकाचे शॉर्ट फिल्म द्वारे समाजप्रबोधन


सध्या युट्युबवर विविध विषयांवर शाॅर्टफिल्म अपलोड केल्या जातात. त्यामध्ये मनोरंजनात्मक, प्रबोधनात्मक अशा विविध प्रकारच्या शाॅर्टफिल्म पहायला मिळतात. ग्रामीण भागातील असे अनेक कलाकार आज आपली कला युट्युब चॅनलच्या माध्यमातून जगासमोर सादर करताना दिसतात. रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय वरवडे ; भागशाळा खंडाळा येथील विद्यार्थी प्रिय मराठी विषय  शिक्षक श्री.एस्.के.जाधव सर यांना मुळातच क्रीडा, सांस्कृतिक तसेच समाजप्रबोधनाची खूप आवड आहे. त्यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालनातून अनेक कार्यक्रमात आपल्या व्यक्तिमत्वाची छाप उमटविली आहे. 

या परिसरातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपल्या समाजाची प्रगती करावी यासाठी ते कायम मार्गदर्शन करत असतात. विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने प्रभावित होऊन  त्यांनी या शाॅर्टफिल्मच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम हाती घेतले आहे. शाळेतील आजी -माजी विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन त्यांनी " दोस्तीची दुनिया "तसेच "निसर्ग " अशा दोन शाॅर्टफिल्म तयार केल्या आहेत. या शाॅर्टफिल्ममधून त्यांनी समाजप्रबोधनाचे उत्तम काम केले आहे. तसेच युवा सेना मुंबई आयोजित युवा शाॕर्ट फिल्म स्पर्धेमध्ये माझे कुटुंब, माझी जबाबदारी  या शाॕर्ट फिल्मचा सहभाग नोंदविला आहे . लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

युट्युब चॅनलवर प्रसारित केलेल्या या दोन शाॅर्टफिल्मला रसिकप्रेमींचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. भविष्यात समाजप्रबोधनाचे अनेक विषय घेऊन ते युट्युब चॅनलवर आपल्या भेटीला येणार आहेत. शाॅर्टफिल्ममध्ये कलाकार म्हणून एस्.के.जाधव सर, विनू मेस्त्री, सुमित कांबळे, साहिल मोहिते, पंकज जाधव, अतुल सावंत, विशाल येलये, संदिप कनावजे, पार्थ माने, श्रीराज माने, पौर्णिमा किर ,श्रद्धा सावंत तर कॅमेरा मॅन म्हणून  विवेक जाधव, जयेश जाधव यांनी आपली भूमिका पार पाडली. शाॅर्टफिल्मचे चित्रिकरण खानविलकर परिवाराचे "कार्तिकी फार्म हाऊस " खंडाळा याठिकाणी घेण्यात आले.

Comments