मिरजोळी श्री देवी महालक्ष्मी-साळुबाई मंदीर नवरात्रौत्सवात बंद राहणार


मिरजोळी येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री महालक्ष्मी साळुबाई देवस्थान कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापन कमीटीने जाहीर केला आहे. पुढील आदेश येईपर्यंत मंदीर उघडणार नसल्याचे राज्य शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवाच्या कालावधीत ग्रामदैवतेचे मंदीर उघडण्याची शक्यता ग्रामस्थांसह भाविकांनी व्यक्त केली होती. परंतु शासन निर्णयानुसार मंदीर बंद राहणार आहे व नवरात्र उत्सावामध्ये देवीचे अंतर्गत धार्मीक विधी, उत्सव लोक सहभागाशिवाय साजरा केला जाणार आहे. मंदीर बंद कालावधीत ग्रामस्थ व भाविकांनी ट्रस्ट कमिटीला सहकार्य करावे, असे आवाहन महालक्ष्मी साळुबाई ट्रस्ट कमीटीने केले आहे.

Comments