रत्नागिरीतील श्री देवी भगवती मंदिर येथे नवरात्रोत्सवाला सुरुवात; घटस्थापनेचा सण उत्साहात साजरा
रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे जिल्ह्यात नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. रत्नागिरीतील श्री देवी भगवती मंदिर, रत्नदुर्ग किल्ला येथे शारदिय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. घटस्थापनेचा सण साधेपणाने सजरा करण्यात आला. विधिवत पूजा, फलाहार, फुलाहार, मंत्रपठण, आरत्या, नैवेद्य आदी कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग ठेवून पार पडले. मंदिराची साधेपणाने सजावट करण्यात आली होती.
शासनाच्या निर्देशानुसार भाविकांना या मंदिरात भगवती देवीचे दर्शन घेता येणार नसल्याचे येथील विश्वस्तांनी सांगितले. श्री देवी भगवती मंदीर येथे दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण यावर्षी हा सण साधेपणाने साजरा केला जात आहे.
दरम्यान या मंदिराचे पुजारी मनू गुरव म्हणाले की राज्यात हॉटेल्स, एस.टी.सेवा, अन्य सर्व उद्योग, व्यवसाय सुरु झाले आहेत. ज्याप्रमाणे आजारावर औषधोपचाराची आवश्यकता असते त्याप्रमाणे देवी, देवतांच्या आशिर्वादाची देखील आवश्यकता असते. त्यामुळे योग्य त्या नियमांची अंमलबजावणी करुन मंदिरे सुरु करण्याबाबत विचार विनीमय करावा असे मत मनू गुरव यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

Comments
Post a Comment