विक्रोळीतील महात्मा फुले रूग्णालय लवकरात लवकर सुरू करा
ईशान्य मुंबई पुर्व उपनगरातील विक्रोळी कन्नमवार नगर येथील बंद असलेले महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून जिल्हाधिकार्याकडे करण्यात आली आहे. अनेक महिन्यापासून दुरुस्तीच्या कारणास्तव हे रुग्णालय बंद ठेवण्यात आले आहे. रुग्णालयात जादा बेड व अनेक सुविधा देण्याचे कामकाज सुरू आहे. उपनगरातील महात्मा फुले रुग्णालय हे मोठे रुग्णालय असून विक्रोळीकरासाठी ते सोयीस्कर आहे. सध्या सदर रुग्णालय बंद असल्याने येथील रुग्णांना राजावाडी तसेच सायन रुग्णालय गाठावे लागते.
आपत्कालीन वेळेस लांब अंतरावरील रुग्णालय गाठताना अनेक रुग्णांचे मृत्यू देखील झाले आहे. बऱ्याच रुग्णांना नाईलाजेने जवळील गोदरेज , हिरानंदानी रुग्णालय येथे जावे लागते. मात्र या तेथील खर्चिक बाब असल्याने सामान्य रुग्णासाठी शासनाने लवकरात लवकर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे विक्रोळीचे तालुका अध्यक्ष कैलास कुशेर यांनी बांद्रा येथे जिल्हाधिकार्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Comments
Post a Comment