रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात प्रस्तावित मेडिकल कॉलेजसाठीच्या जागेचा प्रश्न सुटला
रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित मेडिकल कोलेजसाठीच्या जागेचा प्रश्न सुटला आहे. या दोन्ही मेडिकल कॉलेजच्या संदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी होतील. रत्नागिरीतील दांडे आडम व कापडगाव येथे २५ एकर शासकीय जमीन क्षेत्रावर भव्य मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार आहे. आत्ता सध्या रत्नागिरी जिल्ह्या शासकीय रुग्णालयात मेडिकल कॉलेज सुरु करण्यात येणार आहे.
रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव तयार होणार आहे. यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे मि-या गावातील जागेत प्राणीसंग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे अशी माहीती उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत यांनी दिली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्याधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उदय सामंत म्हणाले की पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकासासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या वतीने आर्टीफिशियल तलाव तयार करुन समुद्राच्या खालचे जग पाहता यावे यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहीती देखील मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Comments
Post a Comment