राजापूर तालुका शिक्षक परिषदेच्या अध्यक्षपदी राजन नाईक

 


राजापूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा राजापूर नविन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यामध्ये नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष म्हणून राजन नाईक व कार्यवाह म्हणून दिनकर बुवा अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये उपाध्यक्ष म्हणून संतोष कोकरे, विलास जाधव, सहकार्यवाह-संजय मांडवकर, कोषाध्यक्ष-शिवाजी नागरवाड, सदस्य म्हणून राजन लिगम, प्रफुल्ल गोसावी, कोंडीराम बुद्रक्ष, संजय कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे, राजेंद्र चव्हाण, सल्लागार म्हणून राधेशाम पांड़ये, मारुती कांबळे अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नूतन कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष एल.एस.पाटील, कार्यवाह पी.एम.पाटील, पतपेढी अध्यक्ष सुनिल गौड यांनी केले.

Comments